भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकांची आवड मोठी । धांवे पाठीं रानोरान

bhavikanchi avad mothi | dhanve pathin ranoran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाविकांची आवड मोठी । धांवे पाठीं रानोरान ॥१॥ कण्या खाये विदुराच्या । उच्छिष्ट गोवळ्यांचें परमप्रिय ॥२॥ उच्छिष्ट फळें भिल्लिणीचीं । खायें रुचे आदरें ॥३॥ पोहे खाये सुदाम्याचे । कोरडे फके मारी साचे ॥४॥ ऐशी भक्ताची आवडी देवा । एका जनार्दनीं करी सेवा ॥५॥