भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकांचें स्थान पंढरी पावन । अभाविकां जाण नावडे तें

bhavikanchen sthan pandhari pavan | abhavikan jan navade ten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाविकांचें स्थान पंढरी पावन । अभाविकां जाण नावडे तें ॥१॥ म्हणोनि चिंतन विठ्ठलाचें वाचें । अभाविकां साचें नावडे नाम ॥२॥ वैष्णवांचा संग नावडे कीर्तन । अभाविकांचा दुर्गुण हाचि देखा ॥३॥ अभाविकांच्या संगें परमार्थ नावडे । एका जनार्दनीं न घडे सेवा कांहीं ॥४॥