भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं

bhavika tya gopi yeto kakulati | tumacheni vishranti majalagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥ मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥ दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहणे तयासी न सांपडे ॥३॥ एका जनार्दनीं भाविकांवांचूनी । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥