भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावें करितां माझी भक्ति । मी आतुडें भक्ताहातीं

bhaven karitan majhi bhakti | mi atuden bhaktahatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भावें करितां माझी भक्ति । मी आतुडें भक्ताहातीं ॥१॥ माझें भक्तीपरतें । साधन नाहीं वों निरुतें ॥२॥ माझें भक्तीचें महिमान । भक्त जाणती सज्ञान ॥३॥ एका जनार्दनीं भाव । स्वयें बोलतसे देव ॥४॥