भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावें घातली कास देव झाला दास । सोशी गर्भवास भाविकांचे

bhaven ghatali kas dev jhala das | soshi garbhavas bhavikanche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भावें घातली कास देव झाला दास । सोशी गर्भवास भाविकांचे ॥१॥ भावचि कारण भावचि कारण । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥ भावाचेनि बळें जीवपणें वोवळें । मन हें सोंवळें ब्रह्मा साम्य ॥३॥ एका जनार्दनीं भावचि कारण । सच्चिदानंदावरी खूण दाविली ते ॥४॥