भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवरोगें जे पिडले लोक । तिहीं आवश्यक सेवावें

bhavarogen je pidale lok | tihin avashyak sevaven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भवरोगें जे पिडले लोक । तिहीं आवश्यक सेवावें ॥१॥ महा मात्रा हरिकीर्तन । उरलें रसायन निज निगुतीं ॥२॥ मागें बहुतां गुणसी आलें । आरोग्यचि ठेविलें करुनियां ॥३॥ निळा म्हणे सांगता फार । होईल विस्तार नामें त्यांची ॥४॥