भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावना अभावना निमाली अंतरीं । वायां हावभरी नाहीं मन

bhavana abhavana nimali antarin | vayan havabhari nahin man

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भावना अभावना निमाली अंतरीं । वायां हावभरी नाहीं मन ॥१॥ कामक्रोध ज्याचे दमोनियां गेलें । इंद्रियें समरसलीं एकें ठायीं ॥२॥ एकपणें सर्व होऊनियां मेळा । रतलें गोपाळाचरणीं मन ॥३॥ तोचि ब्रह्माज्ञानी जगामाजीं धन्य । एका जनार्दनीं चरण वंदी ॥४॥