भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावाचेनी भक्ति थोर । भावें तुटे वेरझार

bhavacheni bhakti thor | bhaven tute verajhar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भावाचेनी भक्ति थोर । भावें तुटे वेरझार ॥१॥ भावें अंकित देव भक्तांचा । वेदशास्त्रा बोले वाचा ॥२॥ भावें गुरुशिष्य दोन्हीं । भावयुक्त सर्व गुणीं ॥३॥ भावें जालें भक्तिपंथ । भावें पुरे मनोरथ ॥४॥ एका जनार्दनीं भाव । भावें दिसे देहीं देव ॥५॥