भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाव धरुनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्रांप्ती । ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर

bhav dharuni sharan yeti | tayan moksha sayujyaprampti | aisi ved ani shruti | garjatase sadar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाव धरुनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्रांप्ती । ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ॥१॥ म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस । प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरें सेविजे ॥२॥ पाहतां नीरा भीवरा दृष्टीं । स्नानें वास त्या वैकुंठीं । पुर्वजही कोटी । उद्धरती सर्वथा ॥३॥ एका जनार्दनीं सांगे । भाक दिधली पांडुरंगें । धन्य संचित जें भाग्य । तेंचि योग्य अधिकारी ॥४॥