भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाव धरी कां रें साचा । उच्चार करीं नामाचा । पंथ विठोबाचा । दृढ धरीं

bhav dhari kan ren sacha | uchchar karin namacha | panth vithobacha | drudh dharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाव धरी कां रें साचा । उच्चार करीं नामाचा । पंथ विठोबाचा । दृढ धरीं ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वाचे । वदे कां रे तूं साचें । दोष जातील जन्माचें । संदेह नाहीं ॥२॥ आळस न करी क्षणभरी । वाचे उच्चार श्रीहरी । यमयातना बोहरी । तेणें होय ॥३॥ भक्ति दृढ धरीं नामीं । पडुं नको वाउगा श्रमीं । विठोबाचे नामीं । विश्वास धरीं ॥४॥ पतित पावन । नाम हें सत्व वचन । एका जनार्दनीं चरणं । दृढ धरीं ॥५॥