भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाळे भोळे वारकरी । हरिनामागजरीं नाचती

bhale bhole varakari | harinamagajarin nachati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाळे भोळे वारकरी । हरिनामागजरीं नाचती ॥१॥ त्यांचा संग देई देवा । नको हेवा दुजा कांहीं ॥२॥ त्यांचें चरणीं राहो मन । आणिक साधन दुजें नको ॥३॥ म्हणती हरि करिती वारी । याहुनी थोरी कोण आहे ॥४॥ तयांजवळी मज ठेवा । एका जनार्दनीं जीवा माझिया ॥५॥