भजनी मालिका
← भजनांकडे परत

भलते वेळे भलतेंचि करी । निर्भीड सर्वदा अंतरीं

bhalate vele bhalatenchi kari | nirbhid sarvada antarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भलते वेळे भलतेंचि करी । निर्भीड सर्वदा अंतरीं ॥१॥ न म्हणे कर्म हें निषिध्द । आलें मना तेंचि शुध्द ॥२॥ लाजेचा पेंडोळा । खाणोनि सांडिला निराळा ॥३॥ निळा म्हणे अवाच्य बोले । छंदे आपुलियाचि डोले ॥४॥