भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिपंथें न चले कोणी । वाट जाईल मोडोनी

bhaktipanthen na chale koni | vat jail modoni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तिपंथें न चले कोणी । वाट जाईल मोडोनी ॥१॥ जरि अनाथा धांवणें । न कराल तुम्ही थोरपणें ॥२॥ आमचा जन्म वायां गेला । शब्द तुम्हांसी लागला ॥३॥ निळा म्हणे नव्हे भली । पुढें वाट खोळंबली ॥४॥