भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिहीन जन्मला पशु । केला नाशु आयुष्याचा

bhaktihin janmala pashu | kela nashu ayushyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तिहीन जन्मला पशु । केला नाशु आयुष्याचा ॥१॥ नाहीं कधीं संतसेवा । करी हेवा भूतांचा ॥२॥ मुखीं नये रामनाम । सदा काम प्रपंचीं ॥३॥ एका जनार्दनीं ते नर । जन्मोनी पामर भूभार ॥४॥