भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिभावार्थ अर्पिला । देव सर्वांगीं धरिला

bhaktibhavartha arpila | dev sarvangin dharila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तिभावार्थ अर्पिला । देव सर्वांगीं धरिला ॥१॥ रानींच रानट वनमाला । भक्ति आणुनी घातली गळां ॥२॥ भक्त अर्पितां आवडीं । देव जाणें त्याची गोडी ॥३॥ भक्तभाव जाणोनि पाही । एका जनार्दनीं राहें देहीं ॥४॥