भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ताविण देवा । कैंचें एकपण सेवा

bhaktavin deva | kainchen ekapan seva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्ताविण देवा । कैंचें एकपण सेवा ॥१॥ भक्तांची सेवा देव करी । देव तिष्ठे भक्त द्वारें ॥२॥ भक्तांचे अंकित । लक्ष्मीसह देव होत ॥३॥ एका जनार्दनीं भक्त । देवा हृदयीं धरीत ॥४॥