भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तासी संकट पडतां । धांवे देव तत्त्वतां लवलाहे

bhaktasi sankat padatan | dhanve dev tattvatan lavalahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तासी संकट पडतां । धांवे देव तत्त्वतां लवलाहे ॥१॥ ऐसा अनुभव आहे । देव लवलाहे धांवत ॥२॥ द्रौपदी पडता संकटीं । धांवे उठाउठी देव तेव्हां ॥३॥ पडतां संकट प्रल्हादासी । कोरडे काष्ठेंसी देव जाहला ॥४॥ पडतां संकट गजेंद्रासी । हाकेसरसी उडी घाली ॥५॥ एकाजनार्दनीं निर्धार । स्मरतां साचार धांवत ॥६॥