भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांवीण देवालागीं । पुसतें जगीं कोण दुजें

bhaktanvin devalagin | pusaten jagin kon dujen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तांवीण देवालागीं । पुसतें जगीं कोण दुजें ॥१॥ नामहि नव्हतें रुपहि नव्हतें । कैसेंनि जाणतें कोण तया ॥२॥ परेहि परता परदेशीं होता । केला भक्तीं सरता आपुल्या बळें ॥३॥ निळा म्हणे तो देवसा केला । भक्तीं आणिला नामा रुपां ॥४॥