भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ताद्वारीं उभाचि तिष्ठे । न बोले न बैसे खालुता

bhaktadvarin ubhachi tishthe | na bole na baise khaluta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्ताद्वारीं उभाचि तिष्ठे । न बोले न बैसे खालुता ॥१॥ युगें जाहलीं अठ्ठावीस । धरुनी आस उभाची ॥२॥ जड मुढ हीन दीन । तारी दरुशनें एकाची ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा वर । दिधला साचार भक्तांसी ॥४॥