भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त करुणाकर दीनाचा वत्सल । उभा श्रीविठ्ठल विटेवरी

bhakta karunakar dinacha vatsal | ubha shriviththal vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्त करुणाकर दीनाचा वत्सल । उभा श्रीविठ्ठल विटेवरी ॥१॥ मना जाय तेथें मना जाय तेथें । मना जाय तेथें पंढरीये ॥२॥ पुरतील काम निवारेल गुंती । आहे ती विश्रांति संतसंगें ॥३॥ आषाढी कार्तिकी सोहळा आनंद । मिळालासे वृंद वैष्णवांचा ॥४॥ एका जनार्दनीं आनंदी आनंद । तेणें परमानंद डुल्लतसे ॥५॥