भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त अर्पितां सुमनमाळा । घाली आवडीनें गळां

bhakta arpitan sumanamala | ghali avadinen galan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्त अर्पितां सुमनमाळा । घाली आवडीनें गळां ॥१॥ ऐसा आवडीचा भुकाळू । श्रीविठ्ठल दीनदयाळु ॥२॥ भक्तें भावार्थें अर्पितां । तें आवडे पंढरीनाथा ॥३॥ भक्तासाठीं विटेवर । समपद कटीं करक ॥४॥ ऐशी कृपेची कोंवळी । एक जनार्दनीं माउली ॥५॥