भजनी मालिका
← भजनांकडे परत

भकतांलागीं पुढारला । येऊनी पुढें उभा ठेला

bhakatanlagin pudharala | yeuni pudhen ubha thela

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भकतांलागीं पुढारला । येऊनी पुढें उभा ठेला ॥१॥ शीण भागही न विचारी । युगानुयुगीं विटेवरी ॥२॥ सोहळा आधिकें अधिक् । करीं भक्तांचे कौतुक ॥३॥ निळा म्हणे बहुमानें । संतां पूजी वांटी दानें ॥४॥