भजनी मालिका
← भजनांकडे परत

भजन भावें गाऊं भजन भावें ध्याऊं । भजन भावें पाहूं विठोबासी

bhajan bhaven gaun bhajan bhaven dhyaun | bhajan bhaven pahun vithobasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भजन भावें गाऊं भजन भावें ध्याऊं । भजन भावें पाहूं विठोबासी ॥१॥ भजन तें सोपें भजन तें सोपें । हरतील पापें जन्मांतरींची ॥२॥ घालूं तुळशीमाळा गोपीचंदन लल्लाटीं । देखतां हिंपुटी यम पळे ॥३॥ सांडूंनियां आशा जालों वारकरी । एका जनार्दनीं पंढरी पाहूं डोळा ॥४॥