भजनी मालिका
← भजनांकडे परत

भजन भावातें उपजवी । देव भक्तांतें निपजवी

bhajan bhavaten upajavi | dev bhaktanten nipajavi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भजन भावातें उपजवी । देव भक्तांतें निपजवी ॥१॥ ऐसा भजनेंचि देव केला । भक्त वडिल देव धाकुला ॥२॥ भक्ताकारणे हां संकल्प । भक्त देवाचाहि बाप ॥३॥ देव भक्ताचीये पोटीं । जाला म्हणोनी आवड मोठी ॥४॥ एका जनार्दनीं नवलावो । भक्ताचि कैसा जाला देवो ॥५॥