भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरें झालें शरण गेलों । संतीं लाविलों निज सोयी

baren jhalen sharan gelon | santin lavilon nij soyi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बरें झालें शरण गेलों । संतीं लाविलों निज सोयी ॥१॥ म्हणती पंढरीचा हाट । करी बोभाट हरीनामें ॥२॥ येईल तो वरावरी । धरील श्रीहरी हदयेंसी ॥३॥ निळा म्हणे एकचि खेपे । खंडती पापें सकळहीं ॥४॥