भजनी मालिका
← भजनांकडे परत

बारा वर्ष बाळपणक गेलें । परि रामराम मुखीं नाहीं आलें

bara varsha balapanak gelen | pari ramaram mukhin nahin alen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बारा वर्ष बाळपणक गेलें । परि रामराम मुखीं नाहीं आलें ॥१॥ अहा रे मूढा जन्मलासी दगड । गमाविलेंक वाड आयुष्यासी ॥२॥ बारा वर्ष तारुण्य अवस्था । कामक्रोधें लाहो घेतला पुरता ॥३॥ बारा वरुषें वृद्धाप्य आलें समुळीं । जराव्याधीं देहासी कवळी ॥४॥ ऐसें आयुष्य गेलें वायांविण । एका जनार्दनीं म्हणे नाहीं घडले भजन ॥५॥