भजनी मालिका
← भजनांकडे परत

बारा सोळाजणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस

bara solajani harisi nenati | mhanoni phirati ratrandivas

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बारा सोळाजणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥१॥ सहस्त्र मुखांचां वर्णितां भागला । हर्ष जया झाल तेणें सुखें ॥२॥ वेद जाणूं गेला पुढें मौनावला । तें गुह्मा तुजला प्राप्त कैंचें ॥३॥ पूर्व सुकृताचा पुर्ण अभ्यासाचा । दास सदगुरुचा तोचि जाणें ॥४॥ जाणते नेणते हरीचे ठिकाणीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥