भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाप तोचि माय होउनी आला पोटीं । जातक वर्णितां गुंती पडली भेटी

bap tochi may houni ala potin | jatak varnitan gunti padali bheti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बाप तोचि माय होउनी आला पोटीं । जातक वर्णितां गुंती पडली भेटी ॥१॥ बाप कीं माय म्हणावा पुत्र । भुललीया श्रुति करितां वृत्तान्त ॥२॥ मी बापापोटीं कीं बापु माझ्या पोटीं । वर्णितां ज्योतिषी विसरले त्रिपुटी ॥३॥ एका जनार्दनीं जातक मौनी । जन्मनाम ठेविलें निःशब्द देउनी ॥४॥