भजनी मालिका
← भजनांकडे परत

बांधोनियां शिखा हिशोबाचे मिसें । एकनाथ बैसे महाव्दारीं

bandhoniyan shikha hishobache misen | ekanath baise mahavdarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बांधोनियां शिखा हिशोबाचे मिसें । एकनाथ बैसे महाव्दारीं ॥१॥ जातां मार्गावरोनि पाहे निजदृष्टी । होतसे कष्टी रुक्यालागी ॥२॥ स्वभावें बोलिलें हास्यमुख वचन । प्रपंच्या कारण महादु:ख ॥३॥ निळा म्हणे ऐसा उपदेश शब्द । ऐकतांचि बोध मना झाला ॥४॥