भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाइलेचा जाहला दास । करी आस मातेची

bailecha jahala das | kari as matechi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बाइलेचा जाहला दास । करी आस मातेची ॥१॥ माकड जैसा गारुड्याचे । तैसा बाइलेपुढें नाचे ॥२॥ पिता सांगतां हित गोष्टी । दुःख वाटे तया पोटीं ॥३॥ ऐसें बाइलेनें गोंविले । एका जनार्दनीं वायां गेले ॥४॥