भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाईल सांगतांचि गोठी । म्हणे मातेसी करंटी

bail sangatanchi gothi | mhane matesi karanti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बाईल सांगतांचि गोठी । म्हणे मातेसी करंटी ॥१॥ जन्मापासुनी आमुचे मागें । अवदसा लागली सांगे ॥२॥ इचे उत्तम नाहींत गुण । ऐसा बोले अभागी जाण ॥३॥ नरदेही ते गाढव । एक जनार्दनीं नाहीं भाव ॥४॥