भजनी मालिका
← भजनांकडे परत

अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां

avyakta parabrahma nhani payanvari | abhed naranari miloniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां ॥१॥ पीतांबर पदरें पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥ निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥ एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥