भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविश्वासा घरीं । विकल्प नांदे निरंतरीं

avishvasa gharin | vikalpa nande nirantarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अविश्वासा घरीं । विकल्प नांदे निरंतरीं ॥१॥ भरला अंगी अविश्वास । परमार्थ तेथें सदा भुस ॥२॥ सकळ दोषांचा राजा । अविश्वास तो सहजा ॥३॥ अविश्वास धरितां पोटीं । एका जनार्दनीं नाहीं भेटी ॥४॥