भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविनाश नाम स्वयंभ संचलें । तें उभें चांगले विटेवर

avinash nam svayambh sanchalen | ten ubhen changale vitevar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अविनाश नाम स्वयंभ संचलें । तें उभें चांगले विटेवर ॥१॥ वर्णितां वेदांसी न कळेचि पार । तें उभे साचार विटेवरी ॥२॥ मौन्यरुप श्रुती राहिल्या तटस्थ । तो आहे मूर्तिमंत विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं नाम अविनाश । गातां जातीं दोष जन्मांतरींचे ॥४॥