भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवगुणीं देखिलें । म्हणोनियां उपेक्षिलें

avagunin dekhilen | mhanoniyan upekshilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवगुणीं देखिलें । म्हणोनियां उपेक्षिलें ॥१॥ माझें वोढवलें कर्म । करी आळी नेणें धर्म ॥२॥ तेणेंचि नेणों संतापली । क्षोमें करुणा हारविली ॥३॥ निळा म्हणे नये । मोहें पाळावया माय ॥४॥