भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघियांसे विश्रातीस्थान । एक विठ्ठल चरण

avaghiyanse vishratisthan | ek viththal charan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघियांसे विश्रातीस्थान । एक विठ्ठल चरण ॥१॥ देह वाचा अवस्थात्रय । अवघें विठ्ठलमय होय ॥२॥ जागृती स्वप्न सुषुप्ती । अवघा विठ्ठलाचि चित्ती ॥३॥ जनीं वनीं विजनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥