भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघियाचि ज्ञानें अवघींचि जाणें । परि एक नेणें आत्मज्ञान

avaghiyachi dnyanen avaghinchi janen | pari ek nenen atmadnyan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवघियाचि ज्ञानें अवघींचि जाणें । परि एक नेणें आत्मज्ञान ॥१॥ बोल तितुके बोलचि वरी । परि न चडे पायरी प्राप्तीची ॥२॥ आपुलेंची हित आपण नेणें । वरी आणिकां शाहाणें करुं धांवें ॥३॥ निळा म्हणे ठकुनी लोकां । आपणहि नर्का जात सवें ॥४॥