भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आतां । चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें

avaghenchi trailokya anandache atan | charanin jagannatha chitta thelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आतां । चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें ॥१॥ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥ एका जनार्दनीं एकपणें उभा । चैतन्याची शोभा शोभलीसे ॥३॥