भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें संतां एकमेळ । अवघा देव तो विठ्ठल

avaghen santan ekamel | avagha dev to viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघें संतां एकमेळ । अवघा देव तो विठ्ठल ॥१॥ अवघे प्रेमरसाचे । अवघे विठ्ठल वदती वाचे ॥२॥ अवघे एकभावी । एका जनार्दनीं सोहंभावी ॥३॥