भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघा काळ हेंचि ध्यान । तुमच्या चिंतन नामाचें

avagha kal henchi dhyan | tumachya chintan namachen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवघा काळ हेंचि ध्यान । तुमच्या चिंतन नामाचें ॥१॥ करुं देवा हे सूदना । ठेवुनी चरणांवरी दृष्टी ॥२॥ गुणचरित्रें श्रवण करुं । अर्थ विवरुं मानसीं ते ॥३॥ निळा म्हणे अवघा धंदा । कीर्तन गोविंदा तुमचें तें ॥४॥