भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीं विष खाउनी मेला । तो स्वयें नरका गेला

avadin vish khauni mela | to svayen naraka gela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आवडीं विष खाउनी मेला । तो स्वयें नरका गेला ॥१॥ कवणा कवण ठेवी दोष । ऐसा मूर्ख तो तामस ॥२॥ अमृत सांडुनी कांजी प्याला । तैसा नर देह गमाविला ॥३॥ लाहूनि उत्तम शरीर । गमाविलें परिकर ॥४॥ एका शरण जनार्दनीं । कोण लोभ जाहली हानी ॥५॥