भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनी पंढरीये आला

avadichya sukha sukhavala | vaikunth sandoni pandhariye ala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनी पंढरीये आला ॥१॥ देखोनियां पुंडलीका । उभा सम पाई देखा ॥२॥ न बैसे खालीं । युगें अठ्ठावीस जालीं ॥३॥ ऐशी भक्तांची माउली । उभी तिष्ठत राहिली ॥४॥ एका जनार्दनीं देव । उभा राहिला स्वयमेव ॥५॥