भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मज्ञानें बिंबलें हृदयीं । दत्त वोळखिला ठायीं

atmadnyanen bimbalen hrudayin | datta volakhila thayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आत्मज्ञानें बिंबलें हृदयीं । दत्त वोळखिला ठायीं ॥१॥ पारिखेपणा दुर केला । अवघा दत्तचि गमला ॥२॥ नामें पवन चराचरें । तें दत्तनाम दोन अक्षरें ॥३॥ एका जनर्दनीं छंद । दत्तनामें लागला वेधु ॥४॥