भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मा तो देहीं नाशिवंत नाहीं । आशाश्वत पाहीं कलेवर

atma to dehin nashivant nahin | ashashvat pahin kalevar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आत्मा तो देहीं नाशिवंत नाहीं । आशाश्वत पाहीं कलेवर ॥१॥ उमजोनी उमजोनी झाकिती डोळे । बळेंचि अंधळे होती मूर्ख ॥२॥ मरणाचे हावे एकमेकां बोलती । गेला गेला म्हणती असोनी जवळी ॥३॥ एका जनार्दनीं ऐसे ते अंध । भुलले मतिमंद भ्रांतियोगें ॥४॥