भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मा नाहींचि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रविकीर्णा

atma nahinchi dekhije aisa | ujalitan prakasha ravikirna

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आत्मा नाहींचि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रविकीर्णा ॥१॥ असोनियां पाठीं पोटीं । न देखेचि दृष्‍टी देखण्या ॥२॥ लेऊनियां सर्वांभरी । असोनि बाहेरी नाढळे ॥३॥ निळा म्हणे उगम जैसा । न देखेचि सहसा सागर ॥४॥