भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतांहि जे गाती नामें । ते पावती निजात्मधामें

atanhi je gati namen | te pavati nijatmadhamen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतांहि जे गाती नामें । ते पावती निजात्मधामें ॥१॥ ऐसी नामा अंगी शक्ती । आहे ठेविली श्रीपति ॥२॥ मुख्य पाहिजे विश्वास । निद्रा सांडूनियां आळस ॥३॥ निळा म्हणे जे जे गाती । ते ते परमपदा जाती ॥४॥