भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां उरलें तें मत । तेथें वस्तु सदोदित । त्यासी नाहीं अंत । कवणे काळीं

atan uralen ten mat | tethen vastu sadodit | tyasi nahin ant | kavane kalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आतां उरलें तें मत । तेथें वस्तु सदोदित । त्यासी नाहीं अंत । कवणे काळीं ॥१॥ महाकारण शरीर । ज्याचा अभिमानी ईश्वर । मुर्ध्नीं तें घर । ब्रह्माडीचें ॥२॥ तेथें नाहीं काळ । त्यासी नाहीं वेळ । उत्तम स्थळ । पवित्र असे ॥३॥ प्रभा आणि ज्योति । रत्‍न आणि दीप्ती । किरण आणि गभास्ती । एकरुप ॥४॥ तैसी वस्तु आणी ईश्वर । एक पैं प्रकार । पृथ्वी अंबर । दोन्हीं एक ॥५॥ तैशा शरीरा ज्योति । आदिमध्य अंतीं । वस्तु तें तत्त्वार्थीं । भरली असें ॥६॥ देह जावो अथवा राहो । आम्हीं वस्तुचि आहों । एक जनार्दनीं भावों । दृढ झालिया ॥७॥