भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां निजप्रेमाची हे जाती । देहभावीं नुरे स्फूर्ति । अवघिया संसारे निवृत्ति । देवो चितीं सर्वदा

atan nijapremachi he jati | dehabhavin nure sphurti | avaghiya sansare nivrutti | devo chitin sarvada

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां निजप्रेमाची हे जाती । देहभावीं नुरे स्फूर्ति । अवघिया संसारे निवृत्ति । देवो चितीं सर्वदा ॥१॥ ओकिलें अन्न जैसें राहे । कोणी फिरोनियां न पाहे । विषय देखोनि तैसें होये । महा वैराग्य त्या नांवे ॥२॥ एक आत्मा न दिसे दुजें । ज्ञान त्या नांव बोलिजे । विरक्ति निर्लोभता ते सहजें । देहममता न बाधी ॥३॥ साहे सर्वीचे अपराध । क्षमा त्या नांव तें अति शुध्द । सोसी अंगी दु:खादि बाध । निर्व्दव्द निर्मत्सर व्देष न करी तो ॥४॥ निळा म्हणे तेचि शांति । सर्वदा आनंदमय चित्तवृत्ति । दया ते भजन सर्वांभूतीं । भक्ती ते देवा न विसंबें ॥५॥