भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां काय पुजुं देवा । माझी मज घडे सेवा

atan kay pujun deva | majhi maj ghade seva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आतां काय पुजुं देवा । माझी मज घडे सेवा ॥१॥ तोडुं गेलों तुळशीपान । तेथें पाहतां मधुसूदन ॥२॥ अत्रगंध धूप दीप । तेंही माझेंचिक स्वरुप ॥३॥ एका जनार्दनीं पूजा । पुज्य पूजक नाहीं दुजा ॥४॥