भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां धर्माधर्म विचार । तो ऐका सविस्तर

atan dharmadharma vichar | to aika savistar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आतां धर्माधर्म विचार । तो ऐका सविस्तर ॥१॥ शुद्र पतीत गृहींचें अन्न । एक रात्र पावन जाण ॥२॥ व्याघ्र – नख गज – दंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त ॥३॥ पटतंतु स्वयें पुनीत । वायूनें शुद्ध उर्णावस्त्र ॥४॥ गोक्षीर पवित्र कास्यपात्रीं । तेंचि अपवित्र ताम्रपात्रीं ॥५॥ घृत पवित्र अग्नि संस्कारीं । अग्नि पवित्र ब्राह्मणमंत्री ॥६॥ वेद पवित्र गुरुमुखें । गुरुपवित्र निजात्मसुखें ॥७॥ पृथ्वी पवित्र जळ संस्कारी । जळ पवित्र पृथ्वीवरी ॥८॥ व्याघ्राजिन मृगाजिन । हें स्वाभाविक पवित्र जाण ॥९॥ एका जनार्दनीं निर्धार । मुख्य पवित्रता अंतर ॥१०॥